। अहमदनगर। दि.04 जून । बिझनेस एक्सप्रेस फांऊडेशन कोल्हापुर यांच्या वतीने विविध क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणार्या व्यक्ती ंना राज्यस्तरीय सेवाश्री पुरस्कार दिला जातो. सन 2023 या वर्षा करीता सहकारातील विशेष कामगिरी केल्याबद्दल दि अंबिका महिला सहकारी बँकेच्या अध्यक्षा बँकेच्या अध्यक्षा सौ. आशाताई दिलीप मिस्कीन यांना विशेष ‘‘सेवाश्री पुरस्कार 2023’’ नुकताच प्रदान करण्यात आला. सौ. आशा मिस्कीन यांनी बँकेच्या अध्यक्षिय कारकिर्दीत उल्लेखनीय काम केल्याबद्दल व सहकार भारती यांच्या माध्यमातून सहकार क्षेत्रामध्ये मोलाचे कामकाज केल्यानेच त्यांना हा बहुमान मिळालेला आहे.
सौ आशाताई मिस्कीन या गेल्या अनेक वर्षापासून अंबिका महिला बँकेच्या संचालिका असून सध्या विद्यमान अध्यक्षा आहेत. त्या स्वतः एमकॉम पदवीधर असून टॅक्स कन्सल्टंट आहेत. मराठा समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिवंगत बबनराव मिस्कीन यांच्या त्या सून आहेत त्यांच्या निवडीबद्दल बँकेच्या संस्थापिका प्रा मेधाताई काळे, उपाध्यक्ष प्रा पुष्पाताई मरकड, आमदार संग्राम भैया जगताप, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे, अहमदनगर जिल्हा सकल मराठा समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत गाडे, आदींसह बँकेच्या सर्व संचालिका,सभासद, ग्राहक, कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.
