। मुंबई । दि.04 जून । “पडद्यावर आणि पडद्याच्या मागेही चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी ‘आई’ ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या निधनामुळे काळाने आपल्यातून ओढून नेली आहे. मराठीसह, हिंदी चित्रपट सृष्टीने एक लोभस, सहज अभिनयाने अनेकांच्या मनमनात घर केलेली एक महान अभिनेत्री आपण गमावली आहे.
महात्मा फुले कृषि विद्यापीठात कांदा बियाणे विक्री सुरु
डोळ्यात तेज, गोरापान चेहरा अन् बहारदार अभिनय. गेली 70 वर्षे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दर्जेदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले आहे.त्यांच्या निधनानं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी कांचन घाणेकर आणि परिवार आहे.
अंबिका महिला बँकेचे अध्यक्षा सौ आशा मिस्कीन यांना सेवाश्री पुरस्कार
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना दादर येथील सुश्रुषा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु आज संध्याकाळी 6 वाजता त्यांचे वृद्धापकाळानं निधन झालं आहे. सुलोचना दीदींनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटातून आपल्या भुमिका निभावल्या आहेत. 'मराठी तितुका मेळवावा' या चित्रपटातून त्यांनी जिजाऊ यांची भुमिका केली होती, जी प्रचंड गाजली होती.
