राज्य शासनाने महाराष्ट्रामध्ये कृत्रिम पावसाची तयारी करण्याची मागणी


। अहमदनगर ।  दि.20 जून ।  दि.4 जानेवारी  व 10 एप्रिल 2023 रोजी स्कायमेट या हवामानाचा अंदाज सांगणार्‍या खाजगी संस्थेने महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या कमी प्रमाणात पाऊस राहील असे सांगितले आहे .भारतीय हवामान विभागाने सुद्धा नुकतेच सहा जुलै पर्यंत पाऊस कमी पडेल असे सांगितले आहे.

बालसंगोपन योजनेच्या लाभासाठी बँक खाते क्रमांकाची माहिती तातडीने सादर करावी 

जून हा शेती मशागतीचा महिना असल्यामुळे या महिन्यात पाऊस पडल्यास शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना सुरुवात करून मूग, बाजरी, उडीद, सोयाबीन, कापूस या पीकांची पेरणी करतात. जून महिन्यामध्ये पाऊस न आल्यास खरीप पिकांचे उत्पादन खूप  कमी  प्रमाणात  होते. ला निना मुळे गेली चार वर्ष भरपूर पाऊस झालेला आहे.

अपहरण करुन व्यापार्‍याला लुटणारी टोळी गजाआड 

मात्र आता अलनिनोचा प्रभाव वाढत असल्यामुळे पाऊस कमी पडू शकतो . पाऊस न पडल्यास माणसांना व जनावरांना पिण्याच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढेल .जनावरे जगविण्यासाठी चारा छावण्या सुरू कराव्या लागतील .मजुराच्या हातांना काम देण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी लागतील .दुर्दैवाने या सर्व उपाययोजना राबविताना मोठ्या प्रमाणावर आर्थिक भ्रष्टाचार होऊन दुष्काळग्रस्तांना पाणी ,चारा व मजुरी कमी देण्याचे दुर्दैवी प्रकार यापूर्वी घडलेले आहेत.

खासगी बस चालकास जबर मारहाण 

मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पाऊस उशिरा व कमी पडणार असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. मात्र मंत्रिमंडळाने चिंता व्यक्त करण्यापेक्षा कृत्रिम पावसाची तयारी करावी अशी मागणी ज्येष्ठ विधीज्ञ कारभारी गवळी, महासचिव अशोक सब्बन, विरबहादूर प्रजापती, कैलास खांदवे, सुनील टाक, भगवान जगताप, बबलू खोसला, अशोक कोकाटे, गणेश इंगळे, विलास खांदवे व जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी शासनाकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेचे गंठण पळवले 

Post a Comment

Previous Post Next Post