अपहरण करुन व्यापार्याला लुटणारी टोळी गजाआड
आरोपींमध्ये पोलीस कर्मचार्याचा सहभाग । स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
। अहमदनगर । दि.19 जून । मनमाड रोडवरून राहुरीकडे जात असलेल्या व्यापार्याचे अपहरण करुन लुटणार्या सराईत गुन्हेगारासह एका पोलिस कर्मचार्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली आहे. आरोपींकडून 10 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जिल्हयातील सहा कृषि सेवा केंद्राचे विक्री परवाने निलंबीत
लुटमारीच्या गुन्ह्यात पोलिस कर्मचार्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याची जिल्ह्यातील ही बहुदा पहिलीच घटना आहे. नगर येथून मनमाड रोडने राहुरीकडे जात असताना व्यापारी अनिल रामचंद्र घाडगे (रा.घोसपडवाडी,ता.राहुरी) यांना रस्त्यात अडवून त्यांच्याकडील रोख रक्कम व दागिने, असा एकूण 10 लाख 20 हजारांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले.
खासगी बस चालकास जबर मारहाण
त्यानंतर चोरट्यांनी घाडगे व त्यांच्या कारचालकास वांबोरी घाटात सोडून दिले. ही घटना मंगळवार दि.6 रोजी घडली होती. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा सराईत गुन्हेगार योगेश खरात (रा.कोपरगाव) व त्यांच्या साथीदारांनी केला असून ते सावळीविहीर फाटा (ता. राहाता) येथे येणार आहेत,
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेचे गंठण पळवले
अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सावळीविहीर फाटा येथे सापळा लावून चार आरोपींनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. योगेश कैलास खरात (वय 24, रा.भोजडे चौक, ता. कोपरगाव) अनिल अण्णासाहेब मालदोडे (रा.पिंपळवाडी,माउलीनगर, शिर्डी,ता.राहाता), गुड्डु उर्फ सागर विठ्ठल मगर (वय 21, रा.हनुमानवाडी, कान्हेगाव,ता.कोपरगाव), सोनु उर्फ सोन्या सुधाकर पवार (वय 25, रा.हॉलीडे पार्क शेजारी शिर्डी) अशी चौघांची नावे आहेत.
नागरिकांना चकरा नकोत यासाठीच ‘शासन आपल्या दारी’ अभियान : उपमुख्यमंत्री
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, सदर गुन्हा करण्यासाठी त्यांना किरण बबन कोळपे (रा. विळद ,ता. नगर), आकाश पांडुरंग शिंदे (विळद, ता.नगर), महेश विठ्ठल वाघ, सोनू उर्फ शुभम रावसाहेब ठोंबे (दोघे रा. खांडके, ता. नगर) अशा चार जणांनी मदत केली असल्याचे समोर आले असून त्यांनाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
विळद बायपास ते डीएसपी चौक रस्त्यासाठी 60 कोटी मंजूर : खा.डॉ.सुजय विखे पाटील
स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई तुषार धाकराव, सफौ भाऊसाहेब काळे, पोहेकॉ मनोज गोसावी, अतुल लोटके, संदीप पवार, देवेंद्र शेलार, पोना रविंद्र कर्डीले, सचिन आडबल, ज्ञानेेशर शिंदे, संतोष खैरे, विजय ठोंबरे, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, पोकॉ आकाश काळे, शिवाजी ढाकणे, रणजीत जाधव, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, किशोर शिरसाठ, चापोहेकॉ उमाकांत गावडे व अर्जुन बडे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
