। अहमदनगर। 14 जून । खासगी बस चालकाला नगरमध्ये 10 ते 12 जणांनी मारहाण केल्याची घटना रविवारी (11 जून) दुपारी घडली. प्रकाश श्रीराम रजक (वय 42, रा. टेकानाका, जबलपूर रोड, नागपूर) असे मारहाण झालेल्या बस चालकाचे नाव आहे.
घरासमोर झोपलेले असताना मोबाईलसह सोन्याची बाळी लंपास
रजक यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भागवत जनार्धन सोळंके (रा. केशवनगर, मुंढवा, पुणे) व त्याच्या ओळखीचे 10 ते 12 इसम (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र फाळके यांच्या घराच्या भिंतीवर लिहले ‘गद्दार’
प्रकाश हे नागपूर येथील पूजा ट्रॅव्हल्समध्ये चालक म्हणून काम करतात. ते नागपूर ते पुणे अशी ट्रीप करत असतात. रविवारी त्यांनी पुणे येथून नागपूर येथे जाणारे प्रवासी बसमध्ये बसविले. बसमधील प्रवासी सोळंके याने गाडीच्या खिडकीची काच उघडी केली.
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेचे गंठण पळवले
तेव्हा प्रकाश त्यांना म्हणाले, गाडीत एसी आहे, तुम्ही काच बंद करा. याचा राग आल्याने सोळंके याने त्याच्या ओळखीचे नगरमधील 10 ते 12 जण बोलून घेतले व प्रकाश यांनी नगरमध्ये बस घेऊन येताच त्यांना मारहाण करण्यात आली. यानंतर त्यांना उपचासाठी दाखल करण्यात आले व गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
