। अहमदनगर । दि.13 । पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोटारसायकल वरून आलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी सत्तर वर्षीय वृध्द महिलेच्या गळ्यातील 30 ग्रॅम वजनाचे (सुमारे 60 हजार रुपये किमतीचे) सोन्याचे गंठण लक्ष विचलित करून हिसकावून ओढून तोडून चोरुन नेले. ही घटना पाईपलाईन रोडवरील श्रीरामचौक, समर्थनगर, सागर हॉटेलच्या मागे घडली.
नागरिकांना चकरा नकोत यासाठीच ‘शासन आपल्या दारी’ अभियान : उपमुख्यमंत्री
या बाबतची माहीती अशी की उषा अनिल सहस्त्रबुद्धे ( वय 70, रा. आई बंगला, हॉटेल सागरच्यामागे, समर्थनगर, श्रीरामचौक, पाईपलाईन रोड, अ.नगर) यांनी दि.9 रोजी सकाळी घराच्या पटांगणात रांगोळी काढुन घरात जाण्यासाठी गेट उघडले व आत जात असतांना त्यावेळी एक मोटारसायकल घरासमोर आली.
तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले दर्शन
त्यावर तीन अनोळखी इसम बसलेले होते. त्यापैकी एक इसम मोटारसायकल वरुन खाली उतरुन त्यांच्या जवळ आला व त्यांना म्हणाला की, शर्मा कुठे राहतात ? असे विचारले यावर त्या इसमास त्यांनी सांगितले की, या कॉलनीमध्ये नविन लोक राहायला आलेले आहे त्यामुळे सांगता यायचे नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नऊ वर्षाचे सरकार हे गरीब कल्याणकारी, सेवा आणि सुशासन असे सरकार : खा.डॉ.सुजय विखे पाटील
असे त्या त्यास म्हणुन कंपाउंडचे गेट लावत असतांना त्या इसमाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे 30 ग्रॅम वजनाचे असलेले मंगळसुत्र (गंठण) हे बळजबरीने ओढुन तोडुन त्याच्या मोटारसायकलवर बसुन भरधाव वेगात निघून गेला. त्यावेळी त्यांनी मोटार सायकलच्या दिशेने पायी पळत जावून पाहिले असता, ती मोटारसायकल हि काळया रंगाची होती तसेच त्या मोटारसायकला नंबर नसल्याचे दिसुन आले.
विद्यार्थ्यांनी स्व कर्तुत्वावर पुढे यावे : खा.डॉ.सुजय विखे पाटील
या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी सौ.ऊषा सहस्रबुद्धे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तीन अनोळखी इसमाविरुध्द जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली.
