महाराष्ट्राला नवी दिल्लीत ३ राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त

महाराष्ट्राला नवी दिल्लीत ३ राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त

साताऱ्यातील मलकापूर, जालन्यातील कडेगाव यासह भारतीय जैन संघटनेस पुरस्कार

 


। नवी दिल्ली ।  दि.20 जून 2023 । पाणी व्यवस्थापन, संवर्धन आणि पाण्याचा पुनर्वापर उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपरिषदेस, जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्रामपंचायतीला आणि भारतीय जैन संघटनेस उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते आज चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्काराने  गौरविण्यात आले.

जिल्हयातील सहा कृषि सेवा केंद्राचे विक्री परवाने निलंबीत

येथील विज्ञान भवनात केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने आज चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन  करण्यात आले.  याप्रसंगी  केंद्रीय जल शक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल आणि विश्वेश्वर टुडू, तसेच केंद्रीय सचिव पंकज कुमार उपस्थित होते.

घरासमोर झोपलेले असताना मोबाईलसह सोन्याची बाळी लंपास

कार्यक्रमात विविध श्रेणीत प्रथम आलेल्या राज्यांना, शहरांना, महानगर पालिकांना, नगर पालिकांना, ग्राम पंचायतींना उपराष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानित  करण्यात आले. द्वितीय आणि तृतीय क्रमांकांचे  पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री. शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सन्मान चिन्ह, प्रमाण पत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेचे गंठण पळवले

उत्कृष्ट ग्राम पंचायत पुरस्कार या श्रेणीमध्ये जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्राम पंचायतीला तिसरा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार सरपंच दत्तु निबांळकर, माजी सरपंच भीमराव जाधव आणि खरपूडी येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ एस.व्ही. सोनुने यांनी स्वीकारला.  हा पुरस्कार मेघालय राज्यातील री भोई जिल्हा येथील मावकिर्देप या ग्राम पंचायती सोबत विभागून मिळालेला आहे.

मुख्यमंत्र्यांकडून दिव्यांग युवकाला तातडीची मदत


Post a Comment

Previous Post Next Post