। अहमदनगर । दि.20 नोव्हेंंबर । धर्माधिकारी मळा येथे एका घरातून सेवानिवृत्त अध्यापिकेच्या तीन तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या. या प्रकरणी मंगल मथुरादास नगरकर (वय ७३ वर्ष) दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी आजारी असल्यामुळे त्यांनी हातातील दोन सोन्याच्या बांगड्या हातातून काढून घराच्या बेडरूमच्या खिडकीमध्ये ठेवल्या व झोपल्या होत्या. यावेळी खिडकीत ठेवलेल्या सोन्याच्या बांगड्या पडल्याचा आवाज आल्याने त्यांना जाग आली. त्यांनी जाऊन पाहिले असता खिडकीच्या खालच्या बाजूला एक सोन्याची बांगडी मिळाली व दुसरी सोन्याची बांगडी मिळाली नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे.
Tags:
Ahmednagar