। अहमदनगर । दि.20 नोव्हेंंबर । अज्ञात चोरट्यांनी एमआयडीसीतील कोटक महिंद्र बँकेचे एटीएम मशीन फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा ते 15 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून या प्रकरणी 17 नोव्हेंबर रोजी येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय देविदास शिंदे (वय 35 रा. नवनाथनगर, बोल्हेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याने 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या नंतर एमआयडीसीतील एलएनटी कंपनी शेजारी असलेले कोटक महिंद्रा बँकेचे एटीएम मशीन फोडुन त्यातील रक्कम पळविण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक टिक्कल करीत आहेत.
Tags:
Crime