। अहमदनगर । दि.17 नोव्हेंंबर । केडगाव, सुपा व शिरुर येथून मोटारसायकली,मोबाईल चोरी करणारा गजाआड करण्यात आला आहे.त्याच्याकडून सात मोटारसायकली व एक अॅपल कंपनीचा स्मार्टफोन असा एकूण 2 लाख 85 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. फरहान फिरोज खान (वय 21, रा. हिनापार्क, मुकुंदनगर, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. केडगाव येथील संकेत विठ्ठल सातपुते (वय 22, रा. अर्चना हॉटेल मागे, नेप्तीरोड, सातपुते गल्ली) यांची घरासमोर लावलेली 15 हजार रुपये किमतीची सुझुकी कंपनीची अॅक्सेस मोपेड अज्ञात चोरट्याने पळविली. त्याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि 379 प्रमाणे मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि अनिल कटके यांना जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकरिता विशेष पथक नेमून कारवाई करण्याचे आदेश काढले होते. नमूद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई सोपान गोरे, सफौ मनोहर शेजवळ, पोहेकॉ दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना शंकर चौधरी, भिमराज खर्से, रवि सोनटक्के, दीपक शिंदे, पोकॉ योगेश सातपुते, जालिंदर माने, मेघराज कोल्हे व चापोहेकॉ बबन बेरड यांना बोलावून मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करुन गुन्हे उघडकिस आणणेबाबत सुचना केल्या होत्या.
फरहान खान (रा. मुकुंदनगर, अहमदनगर) हा साथीदाराच्या मदतीने शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांवरुन मोटारसायकल चोरी करुन विक्री करत असल्याी माहिती पोनि कटके यांना मिळाली. त्यानुसार मुकुंदनगर येथे जाऊन आरोपीच्या ठावठिकाणाबाबत माहिती घेऊन हिनापार्क, मुकुंदनगर, अहमदनगर येथील आरोपीच्या घराचे आजुबाजूस सापळा लावून थांबलेले असताना संशयीत इसम दिसला. त्यास पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. आरोपी खान याने त्याचे साथीदारासह दीड ते दोन महिन्यापुर्वी अहमदनगर, सुपा व शिरुर येथुन चोरी केल्याची कबुली दिली आहे.

---------
Tags:
Breaking