। अहमदनगर । दि.03 नोव्हेंबर । बसमधून प्रवास करणार्या महिलेकडील एक लाख 57 हजार रुपये किमतीचे दागिने दोन महिलांनी चोरले. रविवारी दुपारी तिसगाव (ता. पाथर्डी) ते भिंगार (नगर) बस प्रवासादरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी रुख्मिणी अशोक वारे (वय 40, रा. जोडमोहोज, ता. पाथर्डी) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुख्मिणी वारे या रविवारी दुपारी तिसगाव येथून भिंगारला येण्यासाठी बसमध्ये बसल्या होत्या. त्यांच्याजवळ दोन महिला बसल्या होत्या. त्यांनी वारे यांच्या बॅगमधील दोन तोळ्याचा सोन्याचा हार, नेकलेस, चेन, गंठण, अंगठी, मणी, गळ्यातील शिंपल्या असे एकूण एक लाख 57 हजार रुपयांचे दागिने काढून घेतले.
भिंगारमध्ये उतरल्यानंतर दागिने चोरीला गेल्याचे वारे यांच्या लक्षात आले. त्यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून घेतली असून अधिक तपास पोलिस हवालदार बारगजे करीत आहेत.
----------
💥 मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एससी, एसटी, ओबीसी प्रमाणे निर्वाह भत्ता : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
💥 सेवापुस्तकांची पडताळणी करून घेण्याचे जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांचे आवाहन
Tags:
Breaking