। मुंबई । दि.03 नोव्हेंबर । समाज कल्याण कार्यालयाअंतर्गत असलेल्या महात्मा जोतिबा फुले मुलांचे शासकीय वसतीगृहासाठी खाजगी इमारत जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रुझ, बांद्रा या परिसरामध्ये भाड्याने घ्यावयाची आहे.
१५,००० चौ. फूटाची जागा, स्वतंत्र विद्युत व पाणीपुरवठा असलेल्या स्वतंत्र इमारतीत असल्यास समाज कल्याण, मुंबई उपनगर, नवीन प्रशासकीय इमारत, आर.सी.मार्ग, चेंबूर येथे अथवा 022 25222023 अथवा acswomumbaisub@gmail.com या ईमेल वर संपर्क साधण्याचे आवाहन विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.
वसतीगृह शासकीय असल्याने इमारतीचे भाडे सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी ठरवून दिलेल्या दराप्रमाणे राहील, अशी माहितीही त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
Tags:
Maharashtra