सेवापुस्तकांची पडताळणी करून घेण्याचे जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांचे आवाहन
वेतन पडताळणी पथक 9 ते 11 नोव्हेंबर कालावधीत अहमदनगर जिल्ह्यात
। अहमदनगर । दि.02 नोव्हेंबर । राज्य शासन सेवेतील दिनांक ३१ मार्च, २०२३ पर्यंत सेवानिवृत्त होणारे अधिकारी, कर्मचारी तसेच ज्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना अदयापपर्यंत तात्पुरते निवृतीवेतन कोषागार, उपकोषागार कार्यालयामार्फत प्रदान होत आहे व यापूर्वी आक्षेपित असलेले सेवापुस्तके अशा सेवानिवृत्त होणा-या अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवापुस्तकाची पडताळणी वेतन पडताळणी पथक, नाशिक यांच्यामार्फत जिल्हा कोषागार कार्यालय अहमदनगर येथे दिनांक ०९ ते ११ नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत करण्यात येणार आहे.
सेवानिवृत्त होणा-या अधिकारी, कर्मचारी यांना निवृत्तीवेतन विषयक लाभ वेळेवर प्रदान होवून विलंब होऊ नये यासाठी अहमदनगर जिल्हयामधील सर्व कार्यालय प्रमुख, आहरण व संवितरण अधिकारी यांनी सर्व सेवापुस्तके पडताळणी, तपासणी करुन घ्यावीत, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती भाग्यश्री जाधव-भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.