आपत्ती व्यवस्थापन या राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी राजेंद्र निमसे यांची निवड


। अहमदनगर । दि.16 नोव्हेंंबर । आपत्ती  व्यवस्थापन युनिट महाराष्ट्र यांचे मार्फत शाळा सुरक्षा कार्यक्रमाची (स्कूल सेफ्टी प्रोग्राम ) अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने तीन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण १७ ते १९ नोव्हेंबर या दरम्यान कोथरूड , पुणे येथे आयोजित केले असून या प्रशिक्षणासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबळक येथील प्राथमिक शिक्षक व अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यसंघटक तथा विकास मंडळाचे नूतन संचालक राजेंद्र निमसे यांची निवड झाली आहे .

 महाराष्ट्र राज्यातील ३४ जिल्ह्यांमधून आदर्श शाळेतील ( मॉडेल स्कूल ) प्रत्येक जिल्ह्यातून १० शिक्षक याप्रमाणे ३४० शिक्षकांना  राज्यस्तरीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे .  अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील आदर्श शाळेतील  ३ जि प प्राथमिक , ४ माध्यमिक व ३ उच्च माध्यमिक शिक्षकांची निवड झाली आहे .

या प्रशिक्षणात प्रामुख्याने आपत्ती जोखीम व्यवस्थापनाच्या संकल्पना ,देश आणि राज्यातील शालेय सुरक्षिततेचा परिचय, शाळेच्या सुरक्षेची गरज , शाळा सुरक्षेसाठी जपान व न्यूझीलंड देशातील सर्वोत्तम पद्धती, शालेय आपत्ती व्यवस्थापन योजनेतील घटक, शाळांशी संबंधित धोके आणि धोक्यांचे मूल्यांकन, भेद्यता आणि क्षमता मूल्यांकन, शालेय आपत्ती व्यवस्थापनात पथकांची निर्मिती भूमिका आणि जबाबदाऱ्या, प्रतिबंध आणि शमन उपाय , प्रतिसाद आणि मदत , अग्निसुरक्षा - शोध आणि बचाव तंत्र , मॉकड्रिल आणि प्लॅन अपडेट साठी अपडेट फ्रेमवर्क , शाळेच्या आपत्तीचे पुनरावृत्ती करणे आदींचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे

प्रशिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील , नगर तालुका गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव , विस्ताराधिकारी रामनाथ कराड ,केंद्रप्रमुख बाळासाहेब दळवी, मुख्याध्यापक पोपट धामणे आदींनी अभिनंदन केले आहे .

----- 

💥 दौंड जवळील अपघातात काष्टीचे तीन तरुण ठार

💥  भूमी अभिलेख कार्यालयातील लाचखोर कर्मचारी लाचलुचपतच्या जळ्यात  

💥  वृध्द साहित्यिक व कलावंत मानधन योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन 

Post a Comment

Previous Post Next Post