। अहमदनगर । दि.15 नोव्हेंंबर । साखर कारखान्याकडे ऊस घेवून चाललेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकून तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दौंड-पाटस रोडवर रविवारी (दि.13) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली.
तीनही मयत तरुण हे नगर जिल्ह्यातील काष्टी (ता.श्रीगोंदा) या गावातील रहिवासी होते. मृतामध्ये ऋषिकेश महादेव मोरे (वय 26), स्वप्निल सतिष मनुचार्य (वय 24), गणेश बापु शिंदे (वय 25) याचा समावेश आहे. तिघेही काष्टी बाजारतळ येथील रहिवासी आहे.
या घटनेची माहिती मिळताच काष्टी गावावर शोककळा पसरली आहे. मयत झालेले तिघे तरुण हे दौंड- पाटस रोडने काष्टी गावाकडे मोटारसायकलवर परतत होते. गिरिम गावाजवळ समोरून वाहनाची प्रखर लाईट डोळ्यावर आल्याने त्यांनी मोटारसायकल डाव्या बाजूला घेतली.
त्यावेळी त्यांच्या समोर एक ट्रॅक्टर साखर कारखान्याकडे ऊस घेवून चाललेला होता. त्याच्या ट्रॉलीला कुठेही रिफ्लेक्टर लावलेले नसल्यामुळे त्यांना ट्रॅक्टरचा अंदाज न आल्याने त्यांची मोटारसायकल ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून जोरात धडकली.
Tags:
Breaking