वृध्द साहित्यिक व कलावंत मानधन योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन ; ३० डिसेंबर २०२२ अंतिम मुदत

। अहमदनगर । दि.14 नोव्हेंबर ।   मान्यवर वृध्द साहित्यिक व कलावंत यांच्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत मानधन योजना राबविण्यात येते. सन २०२२ - २०२३ या वर्षासाठी वृध्द कलावंत मानधन योजनेचे प्रस्ताव पात्र कलाकारांनी ३० डिसेंबर २०२२ अखेर पंचायत समिती मार्फत अहमदनगर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे सादर करावेत.

मुदती नंतर आलेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही. पात्र व इच्छुक कलाकार यांनी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचा शासन निर्णय ७ फेब्रुवारी २०१४ अन्वये नमूद अटी व शर्तीनूसार परिपूर्ण प्रस्ताव संबंधित पंचायत समिती यांचेकडेस ३० डिसेंबर २०२२ अखेर सादर करण्याची दक्षता घ्यावी.

 असे आवाहनही जिल्हा स्तरीय वृध्द कलावंत निवड समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे व जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post