। अहमदनगर । दि.29 नोव्हेंंबर । स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या लाभासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
स्व. भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजना महाडिबीटी प्रणाली अंतर्गत राबविण्यात येणार असून शेतक-यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत महाडिबीटी पोर्टलवर अर्ज सादर करण्या्चे आवाहन जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी यांनी प्रसिध्दीस पत्रकाद्वारे केले आहे.
या योजनेअंतर्गत मागील प्राप्त अर्ज व दि. ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत प्राप्त होणारे अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. या योजनांतर्गत मान्यता असलेल्या १६ बहुवार्षिक फळपिकांसाठी (आंबा, काजु, पेरू, डाळिंब कागदी लिंबू, संत्रा, मोसंबी, सिताफळ, आवळा, चिंच, जांभुळ, कोकम, फणस, अंजीर, चिक्कु, नारळ) अनुदान देय राहणार आहे.
तसेच फळबाग लागवडीकरिता कोकण विभाग वगळता इतर विभागासाठी ठिबक सिंचन संच बसविणे अनिवार्य आहे. या योजनेंतर्गत ३ वर्ष कालावधीत प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षी अनुक्रमे 50 टक्के , 30 टक्के व 20 टक्के अर्थसहाय्य देय राहणार असल्याचेही प्रसिध्दी पत्रकात नमुद करण्यात आले आहे.
-------
💥सरकारच्या पैशांचे आमिष दाखवून वृध्द महिलेची फसवणूक
💥अवैध गावठी हातभट्टी ठिकाणांवर छापे
💥बँकेचे एटीएम मशीन फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न