। अहमदनगर । दि.20 नोव्हेंंबर । स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत अवैध गावठी हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकुन दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत एक लाख 55 हजार रूपये किंमतीचे अवैध गावठी हातभट्टीची साधने, दोन हजार 800 लीटर कच्चे रसायन व 150 लीटर तयार दारू नाश केली आहे.
युवराज बजरंग गिर्हे, गणेश पोपट गिर्हे (दोघे रा. खंडाळा ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार मनोहर शेजवळ, बाळासाहेब मुळीक, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, विशाल दळवी, राहुल सोळंके, रोहित येमुल, आकाश काळे, सागर ससाणे, बबन बेरड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
-----
Tags:
Crime