। अहिल्यानगर । दि.31 मे 2025 । अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज (शनिवार) 1 लाख 2 हजार 855 गावरान कांद्याच्या गोण्याचीं आवक झाली आहे. 56 हजार 571 क्विंटल वजन निघाले असून 514 ट्रक कांदा भरला आहे.
अवकाळी पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्यांने मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला आहे.
आज लिलावाच्या वेळी उच्च प्रतिच्या कांद्याला 1700 रुपये भाव मिळाला. तर एक नंबर कांद्याला 1500, दोन नंबर कांद्याला 1200 तिन नंबर कांद्याला 900, चार नंबर कांद्याला 500 रुपये बाजार भाव मिळाल्याचे बाजार समितीने म्हटले आहे.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग
Tags:
Ahmednagar