दर्शनाचा कालवधी निम्यावर आल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी वारीकाळात वशिल्याचे (व्हीआयपी) दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतल्याने दर्शनाची गती आणखी वाढली आहे.
आषाढी पालखी सोहळा पंढरीच्या वेशीवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे विठ्ठल रुमिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी आहे. मागील आठवडाभरापासून भाविकांना दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर समितीने दर्शन वारीचे सुक्ष्म पद्धतीने नियोजन केले आहे.
दर्शनवारीमध्ये घुसखोरी होऊ नयेयासाठी दर्शनबारीला जाळी लावण्यात आली आहे. तर जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी वशिल्याचे दर्शन बंद केल्याने दर्शन रांगेतील भाविकांन लवकर दर्शन मिळू लागले आहे. सध्या दर्शन रांगेत ५० हजाराहून अधिक भाविक उभे आहेत. विठ्ठल रुमिणीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांना केंद्रबिंदू ठेवून मंदिर समितीने भाविकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.