राज्यात पावसाचा जोर वाढला

 राज्यात पावसाचा जोर वाढला

आजही अनेक जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा

 

| मुंबई | दि.०7 जुलै २०२५ |  राज्यात रविवारी पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याचे दिसून येत आहे. अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असून, आज सोमवारी पुन्हा एकदा पावसाचा जोरदार इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि मुंबई उपनगरांसह अनेक भागांत मुसळधार पावसाची शयता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग  

काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वसई-विरार परिसरात रविवार सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली असून वाहनचालकांची मोठी गैरसोय  झाली आहे. पाण्यात खड्डे दिसत नसल्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. सकाळच्या वेळेस मुंबईकडे जाणार्‍या नागरिकांनाही घरात अडकून राहावे लागले 

👉 क्लिक करुन वाचा ... 

Post a Comment

Previous Post Next Post