जगदंबा माता मंदिर फोडून चोरी करणारा चोरटा मुद्देमालासह अटक
नगर तालुका पोलिसांची कारवाई
। अहमदनगर । दि.20 ऑक्टोबर । येथील नगर तालुक्यातील खांडके शिवारातील जगदंबा मातादेवी मंदिराच्या दरवाज्याचे कडी कोयंडा, कुलूप तोडून आतील सोन्याचे मंगळसूत्र चोरणारा चोरटा, नगर तालुका पोलिसांनी सापळा रचून शिताफिने पकडला. त्याच्याकडून चोरीची सोन्याचे मंगळसूत्र जप्त केले.
याबाबतची माहिती अशी की नगर तालुक्यातील खांडके शिवारातील जगदंबा माता मंदिरात झालेल्या घरफोडीत आतील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात भादवि कलम 454, 457, 380 प्रमाणे दाखल गुन्हयातील पोपट सोन्याबापू चेमटे (वय 50 वर्षे, रा.खांडके, ता. नगर ) यांनी फिर्याद दिली होती. त्याचा तपास नगर तालुका पोलीस ठाणे कडून सुरु होता.
मंगळवारी दि.18 रोजी गोपनीय बातमीदारामार्फत सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना ही चोरी ही सुभाष दशरथ पवार ( रा. पवार तांडा, कौंडगाव ता.जि.अहमदनगर) यांनी केली असल्याची माहिती मिळाली. यावरुन त्यांनी पथकामार्फत सापळा लावून संशयीत आरोपीस ताब्यात घेवून त्यास विचारपूस केली असता
त्याने सोन्याचे चोरी केलेले मंगळसूत्र हे दौलावडगाव ता.आष्टी जि.बीड येथील सोनाराकडे गहाण ठेवले असल्याचे त्याने सांगितले. चौकशी दरम्यान या सोनाराने गहाण ठेवलेले मंगळसूत्र तात्काळ पोलीस ठाण्यास हजर केल्याने गुन्हयात मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे. या आरोपीस न्यायालयासमोर हजर केले.
ही कारवाई पोलिस अधिक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप नगर तालुका पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण, पोलीस हवलदार धर्मनाथ पालवे, पोलीस हवालदार शैलेश सरोदे, पोलीस हवालदार सतिष थोरात, पोलीस नाईक बाळू कदम, चालक पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल गोरे यांचे पथकाने केली आहे.
----------
💥दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळ रोखण्यासाठी धडक मोहीम
💥साखर निर्यातीसाठी कोटा पद्धतीऐवजी खुले धोरणच सुरु ठेवावे : मुख्यमंत्र्यांची पत्राद्वारे प्रधानमंत्र्यांना विनंती
Tags:
Breaking