। अहमदनगर । दि.18 ऑक्टोबर । दि. 9 रोजी 09.30 वा सुमारास मधुकर लक्ष्मण नवगिरे (वय 85 वर्षे) हे घरातून कोणाला काही न सांगता निघून गेले. त्यानंतर त्यांचा देवेंद्र मधुकर नवगिरे व त्यांचा भाऊ अरुण मधुकर नवगिरे तसेच बहीण संगीता राजू बोरगे यांनी नातेवाईक व नगर शहरात शोध घेतला, परंतु ते मिळून न आल्याने कोतवाली पोलिस स्टेशन येथे माहिती दिली.
या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी देवेंद्र मधुकर नवगिरे (वय 33 वर्षे, रा.क्रांती भूषण, नगर अजिंक्य कॉलनी, केडगाव, अ.नगर) यांनी दिलेल्या माहितीवरून हरवल्याची नोंद केली. अधिक तपास कोतवाली पोलिस करीत आहे.
हरवलेल्या व्यक्तीचे वर्णन असे ः नाव - मधुकर लक्ष्मण नवगिरे, वय 85 वर्षे, उंची 5 फुट 4 इंच, बांधा मध्यम, रंग काळा सावळा, चेहरा गोल, केस पांढरे, पेहराव धोतर व पांढरा नेहरु शर्ट. ओळख चिन्ह - उजवा डोळा पांढरा. या वर्णनाची व्यक्ती कोणाला आढळल्यास अगर त्यांच्याबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी कोतवाली पोलिस ठाणे फोन नंबर 0241-2416117 यावर संपर्क करावा.