। मुंबई । दि.04 ऑक्टोबर 2022 । मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कारागृहात असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. देशमुख यांना ईडीच्या खटल्यात जामीन मंजूर झाला असला तरी सीबीआयच्या खटल्यात ते अजूनही कोठडीत आहेत. न्यायालयाने देशमुख यांना 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर केला.
100 कोटी वसुली प्रकरणामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, अद्याप सीबीआयकडूनही गुन्हा नोंदवण्यात आल्यामुळे या जामीनावर त्यांची सुटका होणार आहे, का नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटी वसुली प्रकरणी ईडी आणि सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आता ईडीच्या गुन्ह्यातून त्यांना जामीन दिला आहे. परंतु सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात मात्र त्यांना जामीन मिळालेला नाही.
----------
🌞 लॉजचालकाविरुद्ध झाला गुन्हा दाखल
🌞 बांधकाम साईटवरून रंगाचे डबे लांबवणारे अखेर पकडले
🌞 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या ठाण्यातील नवरात्र मंडळांना भेटी
