बांधकाम साईटवरून रंगाचे डबे लांबवणारे अखेर पकडले


। अहमदनगर । दि.04  ऑक्टोबर 2022 ।  नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरातील बांधकाम साईटवरील कलरचे बॉक्स व कटर मशीन असे साहित्य चोरून देणार्‍या दोघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई नगर-कल्याण रोडवरील आदर्शनगर परिसरात केली.

याबाबतची निलेश चंद्रकात गाडेकर (वय 32, रा. काटवन खंडोबा, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या बांधकाम साईट आदर्श नगर (कल्याण रोड) येथील चालू असलेल्या बांधकामावरील कलर व मिक्सींग असा 61 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचा गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्या आदेशाने याचा तपास पोलिस नाईक विष्णु त्रिंबक भागवत यांच्याकडे देण्यात आला. 

ही चोरी अनिकेत राजन जाधव (वय 19 वर्ष, रा. सुयोग पार्क, आदर्श नगर, कल्याण रोड, नगर) व नितीन अलिन परळकर (वय 19 वर्ष, रा आदर्शनगर, विद्या कॉलनी, कल्याण रोड, नगर) यांनी केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. दोन्ही आरोपी कल्याण रोड परिसरात सापडले. त्यांच्याजवळील पिशवीत लोखंडी कलर मिक्सींग मशीन होते. त्यांना चोरीच्या गुन्हयाबाबत विचारपूस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याना या गुन्हयात अटक करण्यात आली.

त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड दिला. दोघांनी  गुन्हयातील चोरुन नेलेला मुद्देमाल कल्याण रोड वरील एका शेतातील उसाच्या पिकातून काढून दिला. ही कारवाई पोलिस हवालदार नितीन गाडगे, पोलिस नाईक बंडु भागवत, आनंद दाणी, कॉन्स्टेबल सुमीत गवळी, अभय कदम,सलिम शेख, अतुल काजळे यांनी केली.

--------

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या ठाण्यातील नवरात्र मंडळांना भेटी 

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हयाच्या विकासासाठी शासन कटिबध्द

गाडीच्या आरशाला धक्का लागल्याने एकास मारहाण 

Post a Comment

Previous Post Next Post