। मुंबई । दि.02 ऑक्टोबर 2022 । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला मोठा धोका असून त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचाही कट रचण्यात आल्याचीही माहीती गुप्तचर विभागाला मिळाली आहे.
मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना तीन वेळा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र महिनाभरापूर्वी आले होते. त्यात मुख्यमंत्री शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आता धमकीचे फोनही शिंदे यांना आले आहेत. याआधीही नक्षलवाद्यांकडून मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत.
सरकारने पीएफआय या संघटनेवर बंदी घातली असून त्याचा या प्रकरणाचा काही संबंध आहे का याचा तपास पोलिस करत आहेत. या आधी नक्षलवाद्यांकडूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धमकी आली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहेले असून या संबंधी तपास सुरू आहे.
----------
💥 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५३ व्या जयंतीनिमित्त सर्व धर्म सभा कार्यक्रम साजरा
💥 खरेदीसाठी आलेल्यांनी मारला पैशांवर डल्ला
💥 आमदार गडाखांचा असाही साधेपणा
