युवक व महिला काँग्रेसच्या वतीने अभिनव आंदोलन

युवकांनी फोडली बेरोजगारीची दहीहंडी, युवकांना रोजगार द्या, नाहीतर चालते व्हा , युवक काँग्रेसचे केंद्र सरकारला खडे बोल 

युवक व महिला काँग्रेसच्या वतीने अभिनव आंदोलन

 

। अहमदनगर । दि.03  ऑक्टोबर 2022 । महाराष्ट्रातून वेदांत प्रकल्प गुजरातला गेला. यावरून काँग्रेसने रणकंदन सुरू केले होते  अजूनही ते थांबायला तयार नाही. नगर शहरात युवक काँग्रेस व महिला काँग्रेसच्या वतीने अभिनव आंदोलन करत माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बेरोजगारीची दहीहंडी फोडली आहे. एवढ्या वरच न थांबता युवकांना रोजगार द्या, नाहीतर चालते व्हा. असे खडे बोल केंद्र सरकारला सुनावले आहेत.

वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ.बाळासाहेब थोरात यांनी आता महाराष्ट्रातल्या युवकांनी रोजगार नाही तर फक्त नुसत्या दहीहंडी फोडायच्या का ? असे म्हणत राज्य सरकारवर तोफ डागली होती. त्याचा धागा पकडत अहमदनगर शहर जिल्हा युवक काँग्रेस, शहर जिल्हा महिला काँग्रेस, शहर ब्लॉक युवक काँग्रेस, ब्लॉक महिला काँग्रेस, भिंगार शहर ब्लॉक युवक काँग्रेस, नगर तालुका युवक काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने चितळे रोडवर आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे परिसर दणाणून गेला होता.

नगर तालुका युवक अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट म्हणाले की, ही बेरोजगारीची दहीहंडी वेदांता प्रकल्प गेला यासाठी फोडली आहेच. मात्र एक्साइड कंपनी नगरमधून जाण्याच्या मार्गावर आहे. यामुळे युवकांचा रोजगार जाणार आहे. त्यासाठी सुद्धा फोडण्यात आली आहे. नगर शहर युवक अध्यक्ष प्रवीण गीते म्हणाले की, दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने तर यापूर्वी युवकांनी पकोडे तळावे अशी अपेक्षा बाळगली आहे. राज्य आणि केंद्र सरकार दोघेही युवकांच्या जीवावर उठले आहेत.

महिला काँग्रेसच्या शहर जिल्हा उपाध्यक्ष राणीताई पंडित म्हणाल्या की, आपल्या तरुण मुलांच्या रोजगारासाठी आता त्यांच्या आयांना देखील रस्त्यावरती उतरण्याची वेळ आली आहे. हे दुर्दैव आहे. महिलांनी आपल्या मुलांना बेरोजगार होताना कसं पाहायचं, असा संत सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. महिला जिल्हा उपाध्यक्ष जाहिदा शेख म्हणाला की, महिला कष्ट करून मुलांना लहानाचं मोठं करतात, शिकवतात. मात्र शिक्षण घेऊन देखील जर ती बेरोजगार राहणार असतील तर महिलांनी पालक म्हणून म्हातारपणी कुणाकडे आधार शोधायचा. शहर जिल्हा सरचिटणीस पूनम वनम यांनी यावेळी बेरोजगारी बरोबर गॅस दरवाढ आणि महागाईच्या समस्येवरून सडकून टीका केली.

यावेळी युवक काँग्रेस शहर जिल्हा सरचिटणीस वैष्णवी तरटे, शहर जिल्हा सरचिटणीस सुरज गुंजाळ, महिला काँग्रेसच्या अर्चना पाटोळे, शेख हलीमा, अरुणा आंबेकर, युवक काँग्रेसचे पदाधिकारी आकाश अल्हाट, कृष्णा साबळे, माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अनिस चुडीवाला, निजाम जहागीरदार, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, अभिनय गायकवाड, इम्रान बागवान, युवक काँग्रेस उपाध्यक्ष पै. दीपक बापू जपकर, गणेश आपरे, मोहनराव वाखुरे, प्रशांत जाधव, बिभीषण चव्हाण, हनीफ मोहम्मद जहागीरदार, शंकर आव्हाड, सुभाष ढेपे, विनोद दिवटे, आकाश आल्हाट, संतोष जाधव, सागर जाधव, राहुल सावंत, किरण नेटके, गोरख ठाकूर, ऋतिक जाधव, गौरव भोसले, विशाल कुऱ्हाडे, स्तवन सोनवणे, महेश काळे, गौरव घोरपडे आदी उपस्थित होते.  

----------

💥 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी

💥  खरेदीसाठी आलेल्यांनी मारला पैशांवर डल्ला 

💥  अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत 

Post a Comment

Previous Post Next Post