। अहमदनगर । दि.19 ऑक्टोबर । संगमनेर तालुक्यातील साखर कारखानाजवळ असलेल्या कारखाना कॉलनी येथील रूम नंबर 42 च्या बंद दरवाजाचे कडी कोयंडा व कुलूप तोडून
कोणीतरी घरातील तीन ग्रॅम वजनाची सोन्याची नथ, तीन ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे टॉप्स, 3 हजार 500 रुपये किमतीचा चांदीचा बाजूबंद व चांदीचा छल्ला असा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी संगमनेर पोलिसांनी करुणा मधुकर मोकळ (वय 32, रा. घुलेवाडी, साखर कारखान्याजवळ, कारखाना कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद केली आहे.
--------
🔅 केडगावमधील वृध्द व्यक्ती घरातून गेली निघून
Tags:
Ahmednagar