प्रवरासंगमला बिंगो जुगारावर ‘एलसीबी’चा छापा! ; बारा जणांना रंगेहाथ पकडले

प्रवरासंगमला बिंगो जुगारावर ‘एलसीबी’चा छापा!

बारा जणांना रंगेहाथ पकडले


। अहमदनगर । दि.17 ऑक्टोबर । नगर-औरंगाबाद रस्त्यावरील प्रवरासंगम गावात अदनान पान स्टॉल शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बिंगो जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून बारा जणांना जेरबंद केले आहे. या कारवाईत एक लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

शोएब अयूब शेख (वय 24 रा. मारूती मंदिराजवळ, कुकाणा, ता. नेवासा), इमान अब्दुल रहीम शेख (वय 31 रा. दहीगाव रोड कुकाणा ता. नेवासा) , रवींद्र जर्नाधन शेट (वय 40 रा. म्हाळापूर ता.नेवासा), संतोष जगन्नाथ पवार (रा.खेडले काजळी, ता. नेवासा), नंदू बाहान चाबुकस्वार (वय 32 रा. समाज मंदीराजवळ प्रवरासंगम, ता. नेवासा), सचिन परसराम डोक (वय 28 रा. गंगापूर ता. गंगापूर जि. औरंगाबाद), बाळू अशोक लगड (वय 30 रा. गंगापूर ता. गंगापूर जि. औरंगाबाद),

प्रसाद बाबासाहेब सोनवणे (वय 25 रा. देवगडफाटा जळका रोड, ता.नेवासा), अमोल जयनारायण लगड (वय 27 रा. कायगाव टोके ता. गंगापूर जि. औरंगाबाद), साहील अशी पठाण (वय 20 रा. देवगांव रोड कुकाणा, ता. नेवासा), प्रल्हाद विेशनाथ मिसाळ (वय 60 रा. देवगड फाटा बकू पिपळगाव रोड, ता. नेवासा), आकाश जालिंदर लष्करे (वय 23, रा. संभाजीनगर नेवासा फाटा, ता, नेवासा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोनि अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रवरासंगम गावात अदनान पान स्टॉल शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये शोएब अयूब शेख हा बिंगो नावाचा जुगार चालवत आहे, अशी बातमी मिळाली. दोन सरकारी वाहनाने पोलीस पथक हे प्रवरासंगम गावात अदनान पान स्टॉल शेजारी पत्र्याच्या शेडजवळ पोहोचले. एक इसम हा बिंगो नावाचा जुगार लोकांना कॉम्प्यूटरच्या साह्याने आकडेवर पैसे घेवून खेळत व खेळवत असल्याचे दिसून आले.

त्यावेळी बिंगो जुगार घेणार्‍या व खेळणार्‍या इसमांना जागीच पकडण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, पोना संदीप संजय दरंदले, पोना विशाल अशोक दळवी, पोना शंकर संपतराव चौधरी, पोकॉ रोहीत अंबादास येमूल, पोकॉ सागर अशोक ससाणे, पोकॉ शिवाजी अशोक ढाकणे, पोना रविकिरण बाबुराव सोनटक्के, पोना लक्ष्मण चिंधू खोकले, चापोहेकॉ बबन भागचंद बेरड यांच्या पथकाने ही कारवाई केली. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

----------

👉नगर जिल्ह्यात यंदा ज्वारीचे उत्पादन घटणार! 

👉मालमत्ताविषयक प्रदर्शनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

👉कामगारांना न्याय देण्यासाठी किरण काळेंच्या नेतृत्वाखाली मजबूत संघटन उभे करणार : साळुंखे 

Post a Comment

Previous Post Next Post