। अहमदनगर । दि.03 ऑक्टोबर 2022 । गाडी लावण्यावरून आणि रस्त्याने जाताना गाडीच्या आरशाला लागलेल्या धक्क्याच्या कारणाने युवकाला बेदम मारहाण केल्याची घटना स्टेशन रोडवर घडली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय झुंबरलाल भळगट (वय 61, रा. पंडीत हॉस्पिटलमागे, स्टेशन रोड) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीचा मुलगा सुयोग याला मारहाण झाली आहे. आरोपींमध्ये ऋषी संतोष कोठारी, संतोष प्रकाश कोठारी, हेमंत कन्हैय्यालाल चोपडा आणि कन्हैय्यालाल माणिकचंद चोपडा यांचा समावेश आहे.
आरोपी आणि फिर्यादी यांच्यात यापूर्वी देखील गाडी लावण्यावरून वाद झालेले आहेत. याबाबत कोतवाली पेालिस ठाण्यात दाखल गुन्हा न्यायप्रविष्ट आहे. तसेच दि. 26 सप्टेंबर रोजी फिर्यादीच्या मुलाला गाडी काढता येत नसल्याने
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा आणि रस्त्याने जाताना गाडीच्या आरशाला धक्का लागल्याच्या रागातून शिवीगाळ करीत आरोपींनी बेदम मारहाण केली आहे. कोतवाली पोलिस अधिक तपास करीत आहेत.
