लॉजमध्ये बेकायदा प्रवेश, लॉजमालकाविरुद्ध गुन्हा
। अहमदनगर । दि.15 ऑक्टोबर । एमआयडीसी परिसरात असलेल्या दोन लॉज मालकांनी प्रवाशांकडून ओळखपत्र न घेता त्यांना लॉजमध्ये प्रवेश दिल्याचे पोलिसांच्या विशेष पथकाच्या तपासणीत आढळून आले. या दोन लॉज मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहशतवाद प्रतिबंधक विभागाच्यावतीने नगर शहरासह जिल्ह्यातील सर्व हॉटेल व लॉज मालकांना प्रवाशांना लॉजमध्ये प्रवेश देताना त्यांचे ओळखपत्र घेण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही काही लॉज मालक या सूचनांचे पालन करीत नसल्याचे आढळून आल्याने विशेष पथकातील सहायक फौजदार मियाँ पापाभाई पठाण, वाय.सी.शेख, पोलिस कॉन्स्टेबल सचिन भिंगारदिवे यांच्या पथकाने एमआयडीसी परिसरातील विविध लॉजची तपासणी केली.
त्यामध्ये हॉटेल साईरत्न लॉजिंगचे चालक नासर महंमद अली पूनमपरंबी (रा. जिमखान्याजवळ, एमआयडीसी) तसेच हॉटेल जिजाऊ लॉजिंगचे चालक अनिल राजू चौधरी (रा. नागापूर, एमआयडीसी) यांनी प्रवाशांचे ओळखपत्र न घेता त्यांना लॉजमध्ये प्रवेश दिल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
---------
💢१०५ गुन्ह्यात ९५ आरोपींना अटक करत १६ लाख २७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
.
