नुकसानीचे पंचनामे करुन दिवाळीआधी मदत द्या : संभाजी दहातोंडे पाटील


। अहमदनगर । दि.13 ऑक्टोबर । नगर जिल्हयात सातत्याने पाऊस पडत असल्याने खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे नगर जिल्हयासह राज्यातील शेती पिकांच्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करुन दिवाळीआधी शेतकर्‍यांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्याना पाठवलेल्या निवेदनात म्हटले की, नगर जिल्हयासह राज्यातील अनेक भागात सातत्याने पाऊस पडत आहे. सततच्या पावसाने खरिपातील तुर, मूग, उडीत, सोयाबीन, बाजरी, कांदा, कापसासारख्या पिकांचे नुकसान झाले आहे.

झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जात असल्याचे महसुल व कृषी विभागाकडून सांगितले जात आहे. मात्र, अजूनही अनेक शेतकर्‍यांपर्यंत पंचनामे करण्यासाठी प्रशासनाचे लोक पोचले नाहीत. पिकविम्याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी 72 तासात कंपनीला कळविल्यानंतरही कृषी विभाग व विमा कंपनीच्या लोकांनी तातडीने येऊन पाहणी करणे गरजेचे आहेत. मात्र, विमा कंपन्याचे प्रतिनिधीही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नगरसह काही भागात दिसून येत आहे.

एकतर शेतकरी कोरोनासारख्या संकटामुळे दोन-तीन वर्षापासून आर्थिक अडचणीत आहे. त्यात यंदा खरिपांतल पिकांचे नुकसान झाल्याने आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. शेतात पाणी साचून राहल्याने रब्बीची पेरणी करण्यालाही अडचणी येत आहेत. उशिराने रब्बीच्या पेरण्या झाल्या की त्याचाही फटका शेतकर्‍यांना सोसावा लागतो.

--------

📌नगरमध्ये शिवसेनेची 'मशाल' मिरवणूक ; ठिक ठिकाणी स्वागत 

📌मराठी फलक न लावणार्‍या दुकानदारांना नोटीसा

📌अहमदनगर -मनमाड मार्गाच्या अवजड वाहतूक मार्गात बदल 

Post a Comment

Previous Post Next Post