। अहमदनगर । दि.13 ऑक्टोबर । शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात मशाल चिन्ह मिळाल्यानंतर बुधवारी नगरमध्ये शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिवसेनेच्या वतीने मशाल पेटवून शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी मशाल चिन्हाचे स्वागत करण्यात आले तर शिवसैनिकांनी परिसर दणाणून गेला होता.
या रॅलीमध्ये महापौर रोहिणी शेंडगे, युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, भगवान फुलसौंदर, सुरेखा कदम, बाळासाहेब बरोटे, संजय शेंडगे, उपजिल्हाप्रमूख गिरीष जाधव, स्मिता अष्टेकर, अरुणा गोयल, गणेश कवडे, सचिन शिंदे, शाम नळकांडे, दत्ता जाधव, संग्राम कोतकर, अशोक दहिफळे,संतोष गेण्णाप्पा, आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी महापौर रोहिणी शेंडगे म्हणाल्या की, शिवसेनेने नेहमीच समाजकार्यास प्राधान्य दिले. त्यामुळे शिवसेनेची जनसामन्यांत चांगली प्रतिमा आहे. त्यामुळे शिवसेनेची जनसामान्यांत चांगली प्रतिमा आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा शिवसेनेवर मोठा विश्वास आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 'मशाल' हे चिन्ह शिवसेनेला मिळाल्याने यापूर्वीही शिवसेनेचे अनेक लोकप्रतिनिधी मशान चिन्हावर निवडून आलेले आहेत.
त्यामुळे हे चिन्ह शिवसैनिकांसह सर्वसामान्यांना प्रेरणा देईल. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. ढोल ताशांच्या गुजरात या मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. या मिरवणुकीची नेता सुभाष चौक येथे सांगता करण्यात आली.
यावेळी शरद कोके, श्रीकांत चेमटे, मुन्ना भिंगारदिवे, सोपानराव कारखिले, अण्णा घोलप, विठ्ठलराव जाधव, दीपक कावळे, रेमेश खेडकर, आंबादास शिंदे, सुमित धेंड आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📌उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर
📌शुभ दिपावली स्वच्छ दिपावली’ या उपक्रमांतर्गत दिवाळीपूर्वी नागरिकांना स्वच्छ सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून द्यावी
📌मराठी फलक न लावणार्या दुकानदारांना नोटीसा
Tags:
Breaking
