। अहमदनगर । दि.14 ऑगस्ट । महामार्ग सुरक्षेसाठी नगर-पुणे रोडवर केडगाव बायपास चौकात बसविलेला सात हजार रुपये किंमतीचा सोलर ब्लिंकर दिवा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. 11 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता ही घटना उघडकीस आली.
👉 शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंचं अपघाती निधन
याप्रकरणी 12 ऑगस्ट रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राहुल सुभाष गवळी (वय 48 रा. अरणगाव ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
👉 गायी चारण्याच्या करणांवरून दोन गटात हाणामाऱ्या
फिर्यादी जी.एच.व्ही. या खासगी कंपनीत मॅनेजर असून ती कंपनी महामार्गांवर सुरक्षेसाठी अपघात होवू नये म्हणून सोलर दिवे बसविण्याची काम करते. या कंपनीने केडगाव बायपास चौकात बसविलेला सोलर ब्लिंकर दिवा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
👉 तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील ११ पोलिसांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’
