। अहमदनगर । दि.14 ऑगस्ट । शहरातील एमआयडीसी परिसरातील मोकळ्या जागेत गाया चारण्याच्या कारणपुढे करत गाया चारायचे पैसे द्यावे लागतील म्हणून वाद होऊन दोन गटात हाणामाऱ्या झाल्या. याप्रकरणी श्रीरामपूर शहर ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
👉 शेतकर्यावर हल्ला करून 70 हजाराचे दागिने लंपास
शहरातील एमआयडीसी परिसरातील मोकळ्या जागेत अक्षय बोलगीकर, दत्तू बोलगीकर, बाबू बोलगीकर पप्पू खाडेकर, मुरलीधर बोलगीकर व अन्य काही लोक गायी चारत असताना नीलेश साबदे, बबलू साबदे, बाबासाहेब साबदे, आप्पासाहेब साबदे, साबदेचा पाहुणा यांनी शिवीगाळ करत येथे गायी चारता येणार नाही, असे म्हणत शिवीगाळ करत मारहाण केली.
👉 तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील ११ पोलिसांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’
याप्रकरणी निलेश साबदे यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अक्षय बोलगीकर, दत्तु बोलगीकर, बाबू बोलगीकर पप्पू खाडेकर, मुरलीधर बोलगीकर व अन्य काही लोकांविरुध्द गुन्हा नोंदवला. दुसऱ्या प्रकरणात अक्षय दत्तात्रय बोलगीकर यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी निलेश साबदे, बबलू साबदे, बाबासाहेब साबदे, आप्पासाहेब साबदे, यांचेविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
👉 ६०८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबरला मतदान
