शेतकर्‍यावर हल्ला करून 70 हजाराचे दागिने लंपास


। अहमदनगर । दि.13 ऑगस्ट । दहिगाव (ता. नगर) शिवारात शेतकर्‍याच्या घरावर चौघांनी हल्ला करून व लोखंडी गजाने मारहाण करून सुमारे 70 हजार रुपये किंमतीचे दागिने चोरले. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंजाबापू मोहन जरे (वय 58) यांनी फिर्याद दिली आहे.

👉 ६०८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबरला मतदान

दहिगाव शिवारातील महादूक मळा येथील शेतकरी मंजाबापू जरे यांच्या घरावर गुरुवारी रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी हल्ला केला. त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. जरे यांना लोखंडी गजाने मारहाण केली तसेच कुटुंबातील महिला आणि सदस्यांना धमकावले.

👉 सुपा-पारनेर रस्त्यावर अपघात; दोघांवर काळाचा घाला

सोन्याचे मंगळसूत्र, कानातील फुले, ओम पान तसेच पायातील चांदीचे जोडवे, पट्ट्या असा सुमारे 70 हजार रुपयांचा ऐवज चोरला. जरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात चौघांविकुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक रणजित मारग पुढील तपास करीत आहेत.

👉 राज्यपालांनी १८ नवनियुक्त मंत्र्यांना दिली पद व गोपनीयतेची शपथ

Post a Comment

Previous Post Next Post