आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एचआयव्ही एड्स जनजागृती कार्यक्रम आणि भव्य रॅली संपन्न


। अहमदनगर । दि.13 ऑगस्ट ।  जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय अहमदनगर यांच्या वतीने 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिन निमित्ताने युवा वर्गामध्ये जनजागृती करण्याकरिता जिल्हा रुग्णालय बाह्य रुग्ण विभागात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दर्शना बारवकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज घुगे, रुग्णालय व्यवस्थापक डॉ. निलेश गायकवाड , नोडल ऑफिसर डॉ.  अरुण सोनवणे,  डॉ. सुमय्या खान डॉ. शिंगारे,  प्राचार्य श्री शरद खटके , श्रीमती सुरेखा आंधळे , डॉ. साहेबराव डवरे, डॉ. विक्रम पानसंबळ, शिवाजी जाधव आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव यांनी केले. त्यात जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभागामार्फत जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या कामाबाबतची, उपलब्ध असलेल्या सेवा केंद्रांची आणि त्या सेवा केंद्र मार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती दिली व कोणकोणत्या प्रकारे एचआयव्ही एड्स प्रतिबंध आणि नियंत्रणाचे काम केले जाते याची माहिती त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची, स्पर्धांची माहिती दिली व स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मागील वर्षभरात आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली.

डॉ. विक्रम पानसंबळ वरिष्ठ यांनी एचआयव्ही संसर्गित रुग्णांना देण्यात येत असलेल्या उपचाराबद्दलची माहिती दिली डॉ. दर्शना बारावकर , वैद्यकीय अधिकारी वर्ग एक यांनी जिल्ह्यात गरोदर मातांसाठी उपलब्ध सोयी सुविधांची माहिती आणि   एचआयव्ही संसर्ग बालकांना जाऊ नये यासाठी जिल्ह्यात असलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती यावेळी दिली. तसेच संसर्ग जाण्याचे प्रमाण या प्रयत्नांमुळे अत्यंत कमी झाल्याचे नमूद केले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे  यांनी युवकांना प्रतिबंध आणि नियंत्रण कामात करण्याकरिता पुढाकार घेण्याचे आवाहन केले. युवकांनी जर एचआयव्ही एडसबाबतचे ज्ञान प्राप्त केल्यास त्यांच्यापर्यंत एचआयव्हीचा संसर्ग जाऊ शकत नाही. आणि त्यांच्याकडे असलेले ज्ञान त्यांनी जर इतरांना दिल्यास निश्चितच भविष्यात एचआयव्ही बाबत आपण शून्य गाठू  शकतो. याकरिता जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभागाकडून वेळोवेळी आयोजित कार्यक्रम, स्पर्धामध्ये सक्रियपणे सहभागी होण्याबद्दल त्यांनी आवाहन केले.

तसेच "भविष्यातील ऐक्यासाठी उत्तम जगाची निर्मिती करणे " या आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या घोषवाक्याच्या अनुषंगाने युवकांना एचआयव्ही एड्सच्या विरोधात आपली वज्रमूठ भक्कम करून भविष्यातील ऐक्यासाठी एचआयव्ही मुक्त उत्तम जगाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

यावेळी विद्यार्थ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक तसेच उपस्थित मान्यवरांकडून एचआयव्ही एड्स बाबतची शपथ देण्यात आली. त्यानंतर रुग्णालयाच्या आवारात विद्यार्थ्यांच्या रॅलीला मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. सदर रॅली ही जिल्हा रुग्णालय आप्पु हत्ती चौक, न्यू आर्टस् कॉलेज,  दिल्ली गेट या ठिकाणाहून परत त्याच मार्गाने जिल्हा रुग्णालय या ठिकाणी येऊन रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये रेसिडेन्शिअल ज्युनियर कॉलेज अहमदनगर,  न्यू आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज , नर्सिंग कॉलेज,  सिव्हील हॉस्पिटल आणि शहरातील इतर महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

रॅलीमध्ये स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव तसेच एचआयव्ही प्रतिबंधच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या घोषणा देऊन सर्वसाधारण जनतेमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. रॅलीच्या समारोपानंतर विद्यार्थ्यांना लायन्स क्लब अहमदनगर मार्फत अल्पोपहार वाटप करण्यात आले
आभार  नवनाथ लोखंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ यांच्यामार्फत एचआयव्ही प्रतिबंधाबाबत पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले

आंतरराष्ट्रीय युवा दिन कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रॅलीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभागाचे श्री राधाकिशन पाटोळे, नवनाथ लोखंडे, प्रवीण देठे, आयसीटीसीचे समुपदेशक राहुल कडूस, सविता बेलेकर, विनय इदे, शर्मिला म्हस्के, भक्ती साम्लेटी, विजय राऊत, गणेश गोत्रल, रणधीर भिसे, तृप्ती पठाडे, राकेश गोहेर आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post