अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी ट्विट करत राज ठाकरेंवर हल्लाबोल

। मुंबई । दि.18 मे 2022 । मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याला भाजपचे उत्तरप्रदेशचे खासदार ब्रीजभूषण शरण सिंग यांनी विरोध केला. 

यावरून शिवसेनेने पुन्हा मनसेला डिवचले आहे. शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यदयांनी ट्विट करत राज ठाकरेंवर हल्लाबोल केला.

ज्यांचे राजकारण दोन तालुक्यांचे ते शिवसेनेला  नोटाचे राजकारण काय शिकवणार? जर भीती वाटत असेल तर अयोध्येत शिवसेनेचा धाक आजही कायम आहे.

आदित्य ठाकरेंना विनंती करून सोबत घेऊ  शकता. माफी मागण्याची गरज लागणार नाही, असा टोला दीपाली सय्यद यांनी ट्विट करत लगावला आहे.

---------------

केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी 

भेसळयुक्त चहा पावडर जप्त अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

कमी पेट्रोल दिल्याच्या संशयावरून हाणामारी 

Post a Comment

Previous Post Next Post