। अहमदनगर । दि.18 मे 2022 । महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत सहकार विभागाच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी ॲड. माणिकराव मोरे यांची सहकार विभागाच्या प्रांताध्यक्षा ॲड. शुभांगी शेरेकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली. विधी मंडळ पक्षनेते तथा राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने व ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांच्या शिफारस नुसार सदर नियुक्ती करण्यात आली.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे समन्वयक ज्ञानदेव वाफारे, जिल्हा उपाध्यक्ष अभिजित लुणिया, सरचिटणीस अंकुश कानडे, शहराध्यक्ष किरण काळे, तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, बाळासाहेब आढाव, संभाजी रोहकले, प्रकाश शेलार, नासिर शेख, देविदास भादलकर, राहुल उगले, मछिंद्र कुटे, मनोज गुंदेचा, नगरसेवक आसिफ सुलतान, आदेश सरोदे, योगेश दिवाने आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मोरे म्हणाले कि, माझ्यावर सोपविलेली जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडील व सामान्यांना भेडसावत असलेली सहकार क्षेत्रातील अडीअडचणी सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल व पक्षाची ध्येयधोरणे सामान्यांपर्यंत पोहोचवेल तसेच मला या पदावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, सत्यजीतदादा तांबे आदींचे मी मनापासून आभार मानतो.
Tags:
Ahmednagar