। मुंबई । दि.18 मे 2022 । शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत फेसबुक पोस्ट केल्यामुळे अडचणीत आलेल्या केतकी चितळे हिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं.
त्याआधी तिची कसून चौकशी करण्यात आली होती. केतकीला ठाणे सत्र न्यायालयानं 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सगळ्यात आधी केतकीविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
तिच्या फेसबुक पोस्टप्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले होते. तिच्यावर कडक कारवाई व्हावी, तिला शिक्षा करावी, अशी मागणीही जोर धरत होती. दरम्यान, पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरुन केतकी चितळे हिला पोलिसांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली. अखेर आता पोलीस कोठडीनंतर तिची रवानगी ही न्यायलयीन कोठडीत केली जाणार आहे.
-----------------
कोविड-१९ मुळे छत्र हरपलेल्या ११ बालकांना ५ लाख रुपयांच्या मुदत ठेवींचे संरक्षण
कमी पेट्रोल दिल्याच्या संशयावरून हाणामारी
नगरकरांचे प्रेम व आशीर्वादामुळे मी सुखरूप : आ.संग्राम जगताप
सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या निर्देशानंतर चित्रनगरीने केली घोषणा