पोलिस निरीक्षक पोवार यांना निलंबित करा, अन्यथा आंदोलन
गोपीचंद पडळकर यांचा इशारा
। अहमदनगर । दि.16 मे । नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील अंतरवाली गावातून एका मुलीचे अपहरण करण्यात आले असून सहा मे 2022 रोजी संबंधित मुलीच्या आई-वडिलांनी नेवासे पोलिस स्टेशनमध्ये जाऊन अपहरणाबाबत तक्रार दाखल केली होती. मात्र, या प्रकरणात मुलीचा शोध घेण्याऐवजी पोलिसांकडून मुलीचा कुटुंबियांना त्रास देण्यात येत असल्याचा आरोप भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना गोपीचंद पडळकर यांनी प्रसारमाध्यमातून विनंती केली आहे की अपहरण झालेल्या मुलीला त्वरित सुखरूप आई-वडिलांच्याकडे सुपूर्द करण्याच्या कारवाईसाठी आदेश द्यावेत तसेच तात्काळ संबंधित पोलिस निरिक्षक पोवार यांना निलंबित करावे व आम्हाला आंदोलन करण्यास भाग पाडू नये. सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुढे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर याला जबाबदार आपणच राहाल, असा इशाराही गोपीचंद पडळकर यांनी निवेदनातून दिला.
दरम्यान, अपहरण झालेल्या मुलीच्या आई-वडिलांनी 6 मे 2022 रोजी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक बाजीराव पोवार यांनी घटनेची चौकशी करण्यासाठी आई-वडीलांना अश्लील शिवीगाळ करीत व दमदाटी करीत एक लाख पंचवीस हजार रुपये वसूल केले असल्याचा आरोपही पडळकर यांच्याकडून आला आहे.
----------------
लोकयुक्त कायदा करा नाहीतर सरकारमधून पायउतार व्हा : अण्णा हजारे
Tags:
Breaking