। पुणे। दि.16 मे 2022। केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या आज (सोमवारी) पुण्यात एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. दरम्यान पुण्यातील शहर महिला काँग्रेस कमिटीच्या रोषाला समोरे जावे लागले.
इराणींना देशातील वाढती महागाई, घरगुती गॅसचे वाढलेले दर यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी चूल व बांगड्या भेट म्हणून देण्यासाठी
गेलेल्या शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पूजा आनंद यांच्यासह महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी थांबलेल्या पुण्यातील हॉटेलबाहेर आंदोलन करत सोमवारी काँग्रेसने महागाईचा मुद्दा उचलला. स्मृती इराणी यांनी यूपीए सरकारच्या काळात महागाईवरून अनेक आंदोलन करून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले होते.
त्यामुळे त्यांना या मागण्या समजू शकतात. त्यांनी महागाई कमी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली. तर काँग्रेसला प्रत्युत्तर देताना इराणी म्हणाल्या की, काँग्रेस तत्कालीन अध्यक्षांना हरवल्यामुळे काँग्रेसवाले नाराज आहेत. त्यांना भाषणातून उत्तर देऊ असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.
जबसे भाजपा सत्ता में है आयी, कमरतोड महंगाई लायी- घोषणा देण्यात आल्या
आंदोलक कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात व स्मृती इराणी यांच्या विरोधात 'हाय, हाय महंगाई मोदीजीने लाई!, जबसे भाजपा सत्ता में है आयी, कमरतोड महंगाई लायी, क्योकि गॅस भी कभी सस्ती थी, स्मृती जी याद हैं ना? अशा प्रकारच्या घोषणा मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या.
---------------
नवनीत राणांनी शिवसेनेला पुन्हा डिवचले!
...अन्यथा आंदोलन : गोपीचंद पडळकर यांचा इशारा
लोकयुक्त कायदा करा नाहीतर सरकारमधून पायउतार व्हा : अण्णा हजारे