मुख्यमंत्र्यांनी सभा घेतलेले मैदान हनुमान चालीसा पठणाने पवित्र करणार
। नवी दिल्ली । दि. 16 मे । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ येथे हनुमान चालीसा पठण करण्याच्या वादावरून तुरुंगात राहावे लागलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला पुन्हा डिवचले आहे. काल मुख्यमंत्री ठाकरे यांनी बीकेसीतील मैदानावर सभा घेतली होती.
आता त्या मैदानावर भव्य सभा घेण्यात येणार असून तेथे हनुमान चालिसाचे पठण करुन ती जागा पवित्र केली जाणार आहे, असे खा. नवनीत राणा यांनी सांगितले आहे. त्यामुळे हनुमान चालीसा मुद्यावरुन पुन्हा एकदा राणा दांपत्य आणि शिवसेना आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी दिल्लीत आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या म्हणाल्या की, मुंबई तोडण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप काल मुख्यमंत्र्यांनी केला. त्यांच्या आरोपात काही तथ्य नाही. उध्दव ठाकरे हे मुंबईकरांची दिशाभूल करत आहेत. मुंबई कधीच केंद्रशासित होणार नाही. महापालिका निवडणुका आहेत
Tags:
Breaking