मागील भांडणातून तिघांनी केली मारहाण


। अहमदनगर । दि.11 मे 2022। मागील भांडणाच्या कारणातून तरुणाला तिघांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. वैभव राजेंद्र मिसाळ (वय 30, रा. सिध्दार्थनगर, अहमदनगर) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याने उपचारादरम्यान कोतवाली पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहन भाऊसाहेब गायकवाड (रा. अरणगाव ता. नगर) व त्याचे दोन अनोळखी मित्र यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. रविवारी सकाळी 11:15 वाजता दौंड रोडवरील पांजरपोळसमोर ही घटना घडली असून रविवारी रात्री कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

रोहन गायकवाड याने वैभव मिसाळ याच्यासोबत असलेल्या मागील भांडणाच्या कारणावरून त्यांना लाकडी दांडक्याने हाता-पायावर मारहाण करून जखमी केले. तसेच रोहनसोबत असलेल्या इतर दोघांनी वैभव यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस नाईक योगेश कवाष्टे करीत आहेत.

------------------

मागील भांडणातून तिघांनी केली मारहाण 

जयश्री जाधव यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

कुंटणखान्यावर छापा टाकून तिन महिलांची सुटका 

रेखा जरे खून प्रकरणातील पत्रकार बोठेची रवानगी नाशिक कारागृहात

Post a Comment

Previous Post Next Post