। अहमदनगर । दि.10 मे । राहुरी तालुक्यातील गुहा गावात चालणार्या कुंटणखान्यावर राहुरी पोलिसांनी छापा टाकून 3 महिलांची सुटका करत स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी कुंटनखाना चालविणार्या महिलेस ताब्यात घेतले आहे.
सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या दरम्यान श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके व राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पोलिस पथकाला बरोबर घेऊन ही कारवाई केली.
नगर मनमाड राज्य महामार्गालगत असलेल्या गुहा गावातील बडोदा बँके जवळ एका बंगल्यात गेल्या अनेक महिन्यांपासून हा कुंटणखाना सुरू होता. मात्र पोलीस प्रशासनला या वेश्याव्यवसायाची साधी भणक लागलेली नव्हती.
सोमवारी रात्री निनावी खबरेवरून या कुंटणखान्यावर छापा टाकण्यात आला. पोलिसांनी बनावट ग्राहक बनून या व्यवसायाचा पर्दाफाश केला. पोलिस आल्याचा सुगावा लागताच ग्राहकांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो व्यर्थ ठरला.
यावेळी पीडित महिला तसेच ग्राहकांना पोलिस पथकाकडून रंगेहाथ पकडण्यात आले. या छाप्यात दीड हजार रूपयांची रोकड, 5 मोबाइल संच पोलिसांनी जप्त केले आहेत.
या प्रकरणी गुहा येथील महिलेवर स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी कुंटणखाना चालवण्यास घराचे रूम उपलब्ध करून देणे तसेच अनैतिक व्यापारास प्रतिबंध या कलमानुसार राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे करीत आहेत.
----------------
शिवराज्याभिषेक दिनी (दि.६ जून) बियाणे महोत्सव आयोजित करा
पंचायत विकास अधिकारी पद निर्मितीसाठी तज्ज्ञ समितीचे गठन : ग्रामविकास मंत्री
रेखा जरे खून प्रकरणातील पत्रकार बोठेची रवानगी नाशिक कारागृहात
Tags:
Maharashtra