भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यादिनाच्या अमृत महोत्सवा निमित्त स्वच्छता रथाद्वारे जिल्हयात जनजागृती करण्यात येणार .
। अहमदनगर । दि.10 मार्च । आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत पाणी व स्वच्छता विभाग यांच्या वतीने जिल्हयातील 140 गावांमध्ये पाणी व स्वच्छता विषयक जनजागृती करण्यात येणार असून गावातील गावकरी यांनी सहभागी होऊन गाव स्वच्छ,शाश्वत व आरोग्यदायी होण्यासाठी योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन ना.सौ.राजश्रीताई चंद्रशेखर घुले-पाटील अध्यक्षा, जिल्हा परिषद यांनी स्वच्छता रथाच्या उद्घाटना प्रसंगी केले.
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत पाणी व स्वच्छता विभाग नेहमी लोकांमध्ये जाणीव जागृती निर्माण व्हावी यासाठी वेगवेगळया प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच भाग म्हणून जिल्हयातील प्रती तालुका 10 ग्रामपंचायती प्रमाणे 140 ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ भारत मिशन, हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) जल जिवन मिशन शुध्द पाण्याची उपलब्धता,
वैयक्तीक स्वच्छता,परिसर स्वच्छता,गावाची स्वच्छता,घर व अन्न पदार्थाचे स्वच्छता, सांडपाण्याची व्यवस्था घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन,मानवी विष्टेचे व्यवस्थापन (वैयक्तिक शौचालय) सार्वजनिक शौचालय तसेच जल जीवन मिशनच्या अनुषंगाने सदर स्वच्छता रथाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.
या प्रसंगी मा.उमेश परहर, सभापती समाज कल्याण विभाग,राजेंद्र क्षीरसागर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, संभाजी लांगोरे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, धनंजय आंधळे महालेखा व वित्त अधिकारी संदिप कोहिणकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग), निखिल ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) मनोज ससे जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालकल्याण विभाग, आनंद रुपनर कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
स्वच्छता रथाच्या माध्यमातून जिल्हयात स्वच्छ भारत मिशन, टप्पा-2 व जल जीवन मिशन च्या विविधि घटकांची प्रचार प्रसिध्दी होणार असून त्याचा फायदा सर्व सामान्य नागरिकापर्यंत पोहचण्यास मदत होणार असल्याची सुरेश शिंदे प्रकल्प संचालक जल जीवन मिशन यांनी सांगितले.
💥 हे देखील वाचा...जिजाऊ ब्रिगेड, लायन्स व लीनेस कल्बच्यावतीने कार्यरत महिलांचा सन्मान
💥 हे देखील वाचा...महाराष्ट्र बाकी है, तो महाराष्ट्र भी तैयार है ; शरद पवार
💥 हे देखील वाचा...शस्त्राचा धाक दाखवून दाम्पत्याला मारहाण