। अहमदनगर । दि.10 मार्च । बंदुक डोक्याला लावून पती-पत्नीस जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली. ही घटना मंगळवारी दुपारी सावेडी उपनगरातील यशोदानगर भाजी मार्केट परिसरात घडली.
याप्रकरणी सात जणांविरुइद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, आर्म अॅक्ट, अॅट्रॉसिटी आदी कलमान्वये गुन्हा दाखल झाला. कुलदीप सुदाम भिंगारदिवे (वय ३८ रा. यशोदानगर, पाइपलाइन रोड सावेडी) यांनी फिर्याद दिली. जागेच्या वादावरून हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले.
जिशान शेख, अशोक शेकडे, तन्मीर नसीर शेख व चार अनोळखी (सर्व रा. नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. फिर्यादी भिंगारदिवे व आरोपी यांच्यामध्ये जागेच्या वादातून न्यायालयात केस सुरू आहे.
मंगळवारी दुपारी भिंगारदिवे व त्यांची पत्नी भाजी आणण्यासाठी यशोदानगर भाजी मार्केटमध्ये जात असताना डोक्याला बंदुक लावून पत्नीला जिवे मारण्याच्या उद्देशाने गळा दाबला व परिवाराला संपवण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे हे करीत आहेत.