जिजाऊ ब्रिगेड, लायन्स व लीनेस कल्बच्यावतीने कार्यरत महिलांचा सन्मान

जिजाऊ ब्रिगेड, लायन्स व लीनेस कल्बच्यावतीने कार्यरत महिलांचा सन्मान

महिलांतील कला-गुणांना उपक्रमांद्वारे नियमीत वाव देऊ : संपुर्णा सावंत


। अहमदनगर । दि.10 मार्च । जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने नेहमीच विविध उपक्रम राबविण्यात येतात. व यापुढेही महिलांसाठी वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करुन त्यांच्यातील कला-गुणांना वाव देण्याचे काम करु असे प्रतिपादन जिजाऊ व लायन्सच्या अध्यक्षा संपुर्णा सावंत यांनी केले.

माजी महापौर सुरेखाताई कदम आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की महिलांनी महिलांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. आपण आपले काम करतांना अनेक महिलांचा संपर्कात येत असतो, अशावेळी आपण एकमेकींना सहकार्य केले पाहिजे. त्यातून महिलांची प्रगती साधली जाऊ शकते, असे सांगितले.

जिजाऊ ब्रिगेड,लायन्स क्लब व लीनेस कल्बच्यावतीने समाजामध्ये विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा सन्मान महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी महापौर सुरेखाताई कदम, नगरसेविका सुवर्णा जाधव, जिजाऊ व लायन्सच्या अध्यक्षा संपुर्णा सावंत, लिनेसच्या अध्यक्ष सुरेखा कडूस, प्रदेश सहसचिव राजश्री शितोळे, 

कल्पना ठुबे, छावा संघटनेच्या अध्यक्ष सुरेखा सांगळे, प्रांतपाल छाया राजपुत, उपाध्यक्षा शारदा पवार, शोभा भालसिंग, अ‍ॅड.अनुराधा येवले, अ‍ॅड.सुनंदा तांबे, मिनाक्षी वाघस्कर, स्वाती जाधव, शर्मिला कदम, सविता जोशी, सारिका गाडे, निलम परदेशी, अमल ससे, मंदा वडगेण, वीरपत्नी अनुपमा भोसले, डॉ.कामिनी, मिना कापसे आदिसह महिला उपस्थित होत्या.

याप्रसंगी सुवर्णा जाधव, शोभा भालसिंग, अनुराधा येवले, यांनी मनोगत व्यक्त करुन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन जिजाऊ वंदनाने करण्यात आली. यानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धा, खेळ, एकांकिका व मनोरंजनाचे अनेक कार्यक्रम घेण्यात आले. सूत्रसंचालन राजश्री शितोळे यांनी केले तर आभार कल्पना ठुबे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post