...महाराष्ट्र बाकी है, तो महाराष्ट्र भी तैयार है ; शरद पवार


। मुंबई । दि.10 मार्च । देशातील महत्वाच्या अशा पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आणि राजकीय प्रश्न उत्तरांनाच सुरवात झाली असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेश, गोवा या ठिकाणी भाजपचे उमेदवार मोठ्या मतांनी निवडून आले आहेत.

यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिलेल्या इशार्‍याला प्रत्युत्तर दिले.

आज लागलेल्या निवडणुकीच्या निकालाचा काहीच परिणाम हा महाराष्ट्रावर झालेला नाही. उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, असे म्हणत असाल तर महाराष्ट्र भी तैयार है, असे म्हणत थेट आव्हान पवार यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांना दिले.

आज भाजप नेते गिरीश महाजन यांनी उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, असे म्हंटले आहे. महाराष्ट्र अभि बाकी है तर महाराष्ट्र भी तैयार है, असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी यावेळी दिले आहे. 

1 Comments

  1. महाराष्ट्र भी तैय्यार है, लेकिन तुम्हे झटका दिखाने के लिए.......

    ReplyDelete
Previous Post Next Post