छत्रपती संभाजीराजांच्या उपोषणाला नगरमधून पाठिंबा
मराठा क्रांती मोर्चा व स्मायलिंग अस्मिताचेही उपोषण
। अहमदनगर । दि.28 फेबु्रवारी । मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले खा. छत्रपती संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यासाठी नगरकरांनी पुढाकार घेतला आहे. येथील मराठा क्रांती मोर्चाने जुन्या बसस्थानकाजवळ तर स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारकाजवळ उपोषण केले.
मराठा आरक्षणाबाबत आश्वासने देऊनही त्याची पूर्ती होत नसल्याने त्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीराजे यांनी शनिवारपासून (26 फेब्रुवारी) मुंबईत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनास राज्यभरातून विविध संघटनांचा पाठिंंबा मिळत आहे.
शनिवारी त्यांनी उपोषण सुरू केल्यावर येथील स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेसह ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या सदस्यांनीही शनिवारी उपोषण केले व मराठा क्रांती मोर्चा अहमदनगर जिल्ह्याच्यावतीने रविवारी उपोषण आंदोलन करीत छत्रपती संभाजीराजे यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यात आला.
Tags:
Ahmednagar